SS Rajamouli ची मोठी घोषणा! RRR नंतर Made In India आणणार | पुढारी

SS Rajamouli ची मोठी घोषणा! RRR नंतर Made In India आणणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केलीय. बाहुबली आणि आरआरआरच्या तुफान यशानंतर राजामौली (SS Rajamouli) यांनी नव्या प्रोजेक्टचे डिटेल्स शेअर केले आहेत. चित्रपटाच्या टायटलसोबत त्यांनी कथा काय असणार, हेदेखील सांगितलं आहे. (SS Rajamouli)

काय आहे चित्रपटाचे टायटल?

एस एस राजामौली यावळी अशा कहाणीवर काम करत आहेत, जे भारतीय चित्रपटाची कहाणी प्रदर्शित करते. चित्रपटाचे टायटल ‘मेड इन इंडिया’ आहे, जी एक बायोपिक असेल. चित्रपटाचे प्रोडक्शन राजामौली यांचा मुलगा एस एस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता करत आहेत. ‘मेड इन इंडिया’चे दिग्दर्शन नितीन कक्कड करत आहेत.

कथेबद्दल काय म्हणाले राजामौली?

एस एस राजामौली यांनी १९ सप्टेंबर रोजी ‘मेड इन इंडिया’ चा एक व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर (X) हँडलवर शेअर केलं आहे. सोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं की, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी चित्रपटाची कथा ऐकली होती, तेव्हा ते इमोशनली कनेक्ट झाले.

एस एस राजामौली म्हणाले, “जेव्ही मी पहिल्यांदा कहाणी ऐकली, तेव्हा माझ्यावर इमोशनली प्रभाव पडला. एक बायोपिक बनवणे, तसे खूप कठीण काम आहे. माझी टीम यासाठी तयार आहे आणि मी कंबर कसली आहे. खूप अभिमानाने ‘मेड इन इंडिया’ प्रेझेंट करत आहे.”

Back to top button