Indian Idol 14 : इंडियन आयडॉलच्या नवीन प्रोमोने सजला गायकांचा मंच

विशाल दादलानी
विशाल दादलानी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रिॲलिटी शोने देशातील नव्या-कोवळ्या आवाजांसाठी आणि संगीत क्षेत्रात मर्दुमकी गाजवण्याची आकांक्षा उरी बाळगणाऱ्या होतकरू गायकांसाठी लॉन्चपॅडचे काम केले आहे. या शोच्या आगामी सत्रात संगीतकार आणि गायक विशाल दादलानी पुन्हा एकदा परीक्षक म्हणून दिसणार आहे आणि यावेळी त्याच्यासोबत असेल राष्ट्रीय पुरस्कार विजेती, गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल आणि बॉलीवूडचा मेलडी किंग कुमार सानू.

एक आवाज, लाखों एहसास' हे या सत्राचे अभियान आहे, ज्यामध्ये एका अशा जादुई आवाजाचा शोध घेण्यात येईल, जो श्रोत्यांना नानाविध भावनांचा अनुभव आपल्या गाण्यातून करून देण्यास सक्षम असेल. या शोच्या नवीन प्रोमोने देशाच्या भावी गायकांसाठी मंच सज्ज केला आहे आणि या शो च्या 14 व्या सीझनने हा सीझन प्रेक्षकांसाठी 'म्युझिक का सबसे बडा त्योहार' असेल अशी हमी दिली आहे!

पुन्हा एकदा परीक्षकाची भूमिका निभावत असलेला विशाल दादलानी म्हणतो, "मी नेहमीच म्हणतो की, इंडियन आयडॉल ही माझ्यासाठी एक 'भावना' आहे. संगीत एक सार्वत्रिक भाषा आहे, जी सर्व मर्यादा ओलांडते. आपल्या अतुल्य देशातील काना-कोपऱ्यातून उत्तमोत्तम प्रतिभा शोधून काढण्याचे अनोखे कसब या शोमध्ये आहे. या लक्षणीय प्रवासात पुन्हा एकदा सहभागी होताना आणि 14 व्या सीझनच्या माध्यमातून अपवादात्मक गायन प्रतिभेचा खजिना शोधताना मला खूप आनंद होत आहे." इंडियन आयडॉल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येत आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news