बिग बॉस मराठी 3 : तृप्ती देसाई -मीनल शाहमध्ये जोरदार राडा | पुढारी

बिग बॉस मराठी 3 : तृप्ती देसाई -मीनल शाहमध्ये जोरदार राडा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरात ( BIGG BOSS MARATHI ३) सुरू असलेल्या साप्ताहिक कार्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे बिग बॉस यांनी विशाल, विकास, जय आणि उत्कर्षला कार्यामधून बाद केले आणि उर्वरित सदस्यांसोबत कार्य पुढे सुरू राहील अशी घोषणा केली. त्यामुळे आजचे कार्य कसे पुढे जाणार ? कोणत्या सदस्यांमध्ये राडे होणार? यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये तृप्ती देसाई यांनी विकासला सांगितले की, मीनल एकदम चिटिंग करते. यावर मीनलचे म्हणणे आहे की, ‘एक नंबरची खोटारडी तृप्ती आहे. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. असा थर्ड क्लास गेम मी कधी आयुष्यात खेळणार नाही. ‘

यावर तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘थर्ड क्लास गेम कोण खेळत आहे ते कळत आहे इथे. संचालक असं करतात का ?’ यानंतर मीनलला राग अनावर झाला आणि ती म्हणली ‘तुम्हाला काय हवं आहे मी गेम सोडू.’ आता नक्की कोण खोटारडी? हे आजच्या भागात समजणार आहे.

बघूया आजच्या बिग बॉसच्या घरात काय- काय घडणार आहे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button