BIGG BOSS MARATHI : उत्कर्ष म्हणतो, तूच कॅप्टन होणार | पुढारी

BIGG BOSS MARATHI : उत्कर्ष म्हणतो, तूच कॅप्टन होणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बिग बॉस मराठीच्या ( BIGG BOSS MARATHI ) घरातील नाती प्रत्येक टास्क दरम्यान बदलताना दिसत आहेत. उत्कर्ष आणि जय यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते की, त्यांना काही झाले तरी मीराला कॅप्टन होऊ द्यायचे नाहीये. आणि त्यासाठी ते दुसर्‍या कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहेत. याची कल्पना मीराला देखील आहे. आज मीनल आणि उत्कर्षमध्ये याचवरुन चर्चा रंगणार आहे. यात मीनलला उत्कर्ष तूच कॅप्टन होणार असे म्हणतो.

मीनल उत्कर्षला तू मला सपोर्ट कर, नक्कीच मी पण तुला सपोर्ट करेन आणि हे तुला माहिती आहे असे सांगते. उत्कर्ष यावर म्हणाला, ‘तुला कॅप्टन व्हायचे आहे ना ? तूच कॅप्टन होणार. सगळ्यांसमोर ओरडून मत देईन तुला. तिथून ते मीराला समोर आणणार. तुला माहिती आहे की नाही हे मला ठाऊक नाही. पण तुला कॅप्टन बनू न देण्यासाठी तुझी टीम प्रयत्न करणार आहे. दोन माणसं तरी नक्कीच करणार हा प्रयत्न. ते तुझ्याबरोबर असतील तर well an गुड.’

‘जसं मला वाटतं आहे ते मीरालाचं टार्गेट करणार. म्हणजे कॅप्टन बनवायला, तसं दाखवणार मीराचं करते आहे. मला मीराला नाही बनवायचं. मी जय आणि दादूसशी बोलतो. जो मै बोलता हू वो करता ही हू ! तुला माहिती आहे. विकासला मी वाचवला जयचा फोटो लावून.” यापुढे याच घडणार यांची उत्सूकता चाहत्यांना लागली आहे.

बघूया अजून या दोघांमध्ये काय- काय चर्चा होणार. खरंचं उत्कर्ष मीनलला सपोर्ट करेल ? जय आणि दादूस याला सहमती देतील? बघूया काय घडतं आजच्या भागामध्ये. बिग बॉस मराठी ( BIGG BOSS MARATHI ) सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button