पेट्रोल डिझेल दर धसक्याने कमी केले; प्रियांका गांधींचा हल्लाबोल | पुढारी

पेट्रोल डिझेल दर धसक्याने कमी केले; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क मनापासून नव्हे तर धसक्याने कमी केले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या
प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केला (प्रियांका गांधींचा हल्लाबोल). प्रियांका गांधी यांनी ट्विट करत ‘ये दिल से नाही डर से निकला फैसला है. वसुली सरकार की लूट को आनेवाले चुनाव में जवाब देना है.’

तीन नोव्हेंबर रोजी प्रियांका यांनी महागाईवरुन ट्विट करत (प्रियांका गांधींचा हल्लाबोल) सरकारवर कठोर टीका केली होती. सणासुदीचे दिवस असून महागाईने सामान्य जनता हैराण आहे.

भाजप सरकारच्या लुटारू मानसिकतेमुळे सणांपूर्वी महागाई कमी करण्यापेक्षा गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, तेल, भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. निवडणुकीआधी एक दोन रुपये कमी करून हेच जनतेसमोर जातील तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल. जनता माफ करणार नाही. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर अन्य राज्यांनही टॅक्स कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली आहे.

गोवा, बिहार, सिक्कीम, कर्नाटक, उत्तराखंड, त्रिपुरा आणि मणिपूर येथे या राज्यांनीही टॅक्स कमी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील प्रतिलिटर १२ रुपये टॅक्स कमी केला आहे. त्यामुळे दर कमी केले आहेत. बिहार सरकारने एक रुपये ३० पैसे आणि डिझेल एक रुपये आणि ९० पैशांची कपात केली आहे. आसाम सरकारने सात रुपयांची कपात केली आहे.

भाजपचा पराभव केला तर ५० रुपयांनी दर कमी

इंधन दर कपातीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Raut Vs BJP)  यांनी केंद्र सरकारला चिमटे काढलेले आहेत. “राज्य सरकार दर वाढवत नाही. राज्य सरकार या महागाईविरोधात आहे. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते. १०० रुपये वाढवायचे आणि त्यातील ५ रुपये कमी करायचे ही खेळी आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. इंधन दरवाढीतून कोट्यवधी रुपये कमविले”, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

हेही वाचा : 

Back to top button