Chandramukhi 2 : कंगना रानौत हॉरर कॉमेडी ‘चंद्रमुखी-२’मध्ये कशी आली? | पुढारी

Chandramukhi 2 : कंगना रानौत हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी-२'मध्ये कशी आली?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पी वासू दिग्दर्शित आणि कंगना राणौत, सत्यराज आणि राघव लॉरेन्स यांच्या प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी-२ हा १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Chandramukhi 2) कंगना राणौतने अनेक बॉलिवूडपटात काम केले आहे. आता ती साऊथ चित्रपटात कशी वळली, हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. (Chandramukhi 2)

जेव्हा चंद्रमुखी २ च्या ऑडिओ लॉन्च इव्हेंटला उपस्थित होती, तेव्हा तिने चित्रपटाच्या प्रस्तावांबद्दल आपले विचार शेअर केले. तिने सांगितले की, आपल्या कारकिर्दीत कधीही कोणाला कामासाठी विनंती केली नाही. कंगना म्हणाली की, निर्माता आणि दिग्दर्शक एका मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होते आणि तेव्हाच तिने तिला काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तिची विनंती पी वासू यांनी मान्य केली आणि तिला परफॉर्म करण्याची संधी दिली.

चित्रपटाचे मुख्य अभिनेता राघव लॉरेंस याविषयी माहिती नव्हतं की, कंगना तेलुगू चित्रपटाकडे कशी आली? इव्हेंटमध्ये जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. राघव प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगात अभिनेता, कोरिओग्राफर, दिग्दर्शक म्हणून काम करतात. लक्ष्मी, स्टाईल, इंद्रा आणि कांचना २ यांसारख्या चित्रपटांतील अभिनयासाठी ते ओळखले जातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

Back to top button