पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटातील किंग खान आणि माहिराच्या जोडीला खूप पसंत केले होते. (Mahira Khan) या चित्रपटाच्या वेळी तिला असे पॅनिक ऑटॅक येऊ लागते होते की, अखेरीस बायपोलर डिसऑर्डरचे निदान झाले. तिने या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. रईस चित्रपटानंतर जेव्हा २०१६ रोजी उरी हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. तेव्हा तिला बायपोलर डिसऑर्डर डायग्रोसिक निदान झाले होते. तिला पॅनिक ॲटॅक येऊ लागले होते. (Mahira Khan)
माहिरा खान एका कार्यक्रमात पोहोचली होती. तेव्हा तिने सांगितलं की, ती एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. आणि जवळपास मागील ६-७ वर्षांपासून डिप्रेशन, एंग्जायटीचे औषध घेत आहे.
माहिराने सांगितलं की, "हे ॲटॅक येणे अचानकपणे सुरू झाले. मी चित्रपटाचे शूटिंग करत होते. मी बॉलीवूडमध्ये काम करत होते. सर्वकाही चांगलं चाललं होतं. तेव्हा उरी हल्ला झाला. यानंतर राजकीय स्तरावर अनेक गोष्टी बदलल्या. पाकिस्तानी कलाकारांना भारतात बॅन करण्यात आलं. हे सर्व माझ्यासाठी मानसिक धक्का होता. कारण, त्यावेळी लोक माझ्याविरोधात सातत्याने ट्विट करत होते. मला फोन कॉल्सवर धमक्या मिळत होत्या."