Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल २ ची जबरदस्त ओपनिंग | पुढारी

Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल २ ची जबरदस्त ओपनिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्मान खुराना पुन्हा एकदा पूजा बनून ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) मध्ये धुमाकूळ घालत आहे. ड्रीम गर्ल २ आज २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी गदर २ पेक्षाही चांगला रिस्पॉन्स मिळाला. रिपोर्टनुसार, २५ ऑगस्टला चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. (Dream Girl 2) पहिल्या दिवशीची कमाईचा अर्ली ट्रेंडदेखील सुरू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, ड्रीम गर्ल २ ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल केलीय.

ड्रीम गर्ल – २ शुक्रवारी आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेचा मोस्ट अवेटेड चित्रपट ड्रीम गर्ल २ चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशीपासून या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. ओपनिंग डे वर ड्रीम गर्ल २ ला बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात मिळाली आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९.७० कोटींची कमाई केलीय. पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्स अशी तिन्ही नॅशनल चेन्सने पहिल्या दिवशी ड्रीम गर्ल २ च्या एकूण कलेक्शनमध्ये जवळपास ६० टक्के योगदान दिले आहे आणि सुमारे ५.३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहेत.

गदर २ आणि जेलरच्या यशादरम्यान, ड्रीम गर्ल २ ने दमदार सुरुवात केली. सनी देओलच्या गदर २ ने पहिल्या दिवशी सुमारे ३५ कोटी रुपयांची कमाई केली, तर रजनीकांतच्या जेलरने भारतात जवळपास ४४.५० कोटी रुपये कमावले. शिवाय, गदर २ हा पठाण नंतर २०२३ मध्ये बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

Back to top button