चांद्रयान 3 : माधवनच्या ‘रॉकेटरी’पासून ते जॉर्जेस मेलीसच्या ‘चंद्राची सहल’ पर्यंत चित्रपटसृष्टी चंद्रावर जाते तेव्हा..! | पुढारी

चांद्रयान 3 : माधवनच्या 'रॉकेटरी'पासून ते जॉर्जेस मेलीसच्या 'चंद्राची सहल' पर्यंत चित्रपटसृष्टी चंद्रावर जाते तेव्हा..!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी हा अभिमानाचा क्षण लोकांच्या खूप जवळ आणलेला आहे. प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे. जेव्हा चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल त्‍यावेळी आपला देश महाविश्वविक्रम करेल.

फिल्‍म इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये अवकाश, एलियन आणि चंद्रावर पोहोचणे यासारख्या संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेल्‍या आहेत.

‘हे’ आहेत चित्रपट

A Trip To The Moon हा फ्रेंच चित्रपट आहे. जो 1902 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन जॉर्जेस मेलीस यांनी केले होते. या चित्रपटात अंतराळवीरांच्या एका गटाची कथा सांगितली आहे. यामध्ये तोफेने चालवलेल्या कॅप्सूलमध्ये चंद्रावर प्रवास करतात आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती दिली आहे. हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट आहे.

Kalai Arasi हा चित्रपट 1963 मध्ये ए. काशिलिंगम यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटात एलियन्स पृथ्वीवर येताना दाखवण्यात आले होते. त्याच वेळी, अंतराळ संकल्पनेवर बनलेला हा तमिळ सिनेमातील पहिला चित्रपट होता.

Chand Par Chadhai हा चित्रपट 1967 मध्ये टीपी सुंदरम दिग्दर्शित केला. हा फ्रेंच चित्रपट ‘अ ट्रिप टू द मून’ सारखाच आहे. यामध्ये चंद्रावर यान अंतराळवीरांच्या गटाभोवती फिरते. लँडिंग केल्यावर, त्यांना दुसर्‍या ग्रहावरील अनेक एलियन्स भेटतात.

Koi Mil Gaya हा चित्रपट 2003 मध्ये राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला. कोई मिल गया या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झिंटा, रेखा, प्रेम चोप्रा, रजत बेदी आणि जॉनी लीव्हर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट एका दिवंगत मुलाची कथा सांगतो जो त्याच्या दिवंगत वडिलांचा जुना संगणक शोधतो आणि त्याच्याशी खेळताना एलियन्स येतात.

Antariksham 9000 kmph हा चित्रपट 2018 मध्ये संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केला. चित्रपटाची कथा एका उपग्रहाभोवती फिरते ज्याचा स्पेस स्टेशनशी संपर्क तुटला आणि त्याचा वेग वाढला. देव हा एकमेव व्यक्ती आहे जो त्याची दुरुस्ती करू शकतो, असे दाखवण्यात आले आहे.

Mission Mangal 2019 मध्ये प्रदर्शित झाला आहे. जगन शक्ती दिग्दर्शित, या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी आणि शर्मन जोशी या अभिनेत्‍यांनी काम केले आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या जीवनावर आधारित आहे. जे भारताच्या सर्वात मोठ्या अंतराळ मोहिमेचा भाग होते.

Rocketry : The Nambi Effect 2022 मध्ये आर. माधवन यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्‍या हा चित्रपट भारतीय एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. ते एक प्रतिभाशाली होते, भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला मोठ्या उंचीवर नेण्याची त्यांची आवड होती. त्याचा संघर्ष आणि वाद या सर्व गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

.हेही वाचा

मनोरंजन : नव्या पिढीचं नवं रामायण

ek villain returns : एक व्हिलन रिटर्न्स बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल का?

Chandrayaan-3 mission | भारताच्या चांद्रयान-३ लँडिंगची रशियालाही उत्सुकता, दिली प्रतिक्रिया

Back to top button