

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'चांद्रयान-३' मिशनवर आक्षेपार्ह ट्विट करणे प्रकाश राज यांना महागात पडले आहे. प्रकाश राज यांच्या विरोधात कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Prakash Raj ) रिपोर्टनुसार, चांद्रयान-३ मिशनवरून अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करून पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता हिंदू संघटनेच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. (Prakash Raj)
ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी मायक्रोब्लॉगिंग साईट X वर (ट्विटर) शर्ट आणि लुंगी घातलेल्या एका व्यक्तीचे व्यंगचित्र शेअर केले होते, ज्यामध्ये तो चहा ओतताना दिसत होता. यासोबत अभिनेत्याने लिहिले की, नुकतेच चांद्रयानचे पहिले दृश्य मिळाले.. विक्रमलँडर फक्त टास्किंग करत आहे." दुसरीकडे, प्रकाश राज यांना त्यांच्या ट्विटनंतर जोरदार टीकेला सामोरे जावे लागले. प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मिशनची खिल्ली उडवणे नेटकऱ्यांना आवडले नाही. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करत चांद्रयान-३ मिशन देशाच्या अभिमानाशी जोडले असल्याचे सांगितले.
त्याचवेळी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागणाऱ्या या अभिनेत्याने माफी मागण्याऐवजी स्पष्टीकरण दिले. आणखी एक ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची टिप्पणी केवळ विनोद म्हणून होती. त्यांनी लिहिले, "द्वेष केवळ द्वेष पाहतो… ट्रोलर्सनी कोणता चायवाला पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल, तर हा विनोद तुमच्यावर आहे." .. फक्त विचारात मोठे व्हा"