HBD Randeep Hooda : गाड्या धुतल्या, रेस्टॉरंटमध्ये काम केलं, रणदीपने कसं मिळवलं इतकं यश

randeep hooda
randeep hooda
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाचा रणदीप हुड्डा या अभिनेत्याला आज कोण ओळखत नाही. जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेला रणदीपने अनेकदा हरियाणवी भूमिका साकारल्या आहेत. शिवाय रणदीप हुड्डा ३२ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. रणदीपला बॉलीवूडमध्ये २० वर्षाहून अधिक काळ झाला आहे. (HBD Randeep Hooda ) त्याचा पहिला चित्रपट २००१ मध्ये मान्सून वेडिंग रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने एका एनआरआयची भूमिका साकारली होती. पण ह्याच अभिनेत्याने एकेकाळी गाड्या साफ केल्या, रेस्टॉरेंटमध्ये कामदेखील केलं आहे. २० ऑगस्ट रोजी रणदीपचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसादिवशी त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेऊया. (HBD Randeep Hooda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

रणदीप ८ वर्षांचा होता, त्यावेळी त्याला एमएनएसएस बोर्डिंग स्कूल सोनीपत येथे पाठवण्यात आले होते. त्याने आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रतिष्ठित आरके पुरम दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तो उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात गेला. तेथे त्याने मार्केटिंग आणि मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणाच्या दरम्यान चायनीज रेस्टॉरेंटमध्ये काम केलं. गाड्या साफ केल्या. टॅक्सीदेखील चालवली. २ वर्षांनंतर तो भारतात परतला. त्याला एअरलाईन्सच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जॉबदेखील मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

चित्रपट करिअरची सुरुवात

हुड्डाच्या चित्रपट करिअरची सुरुवात २००१ मध्ये मीरा नायरचा चित्रपट मानसून वेडिंगमधून झाली होते. नंतर ४ वर्षांनी दुसरा प्रोजेक्ट मिळाला. त्याला रामगोपाल वर्माची साथ मिळाली. हुड्डाचे भाग्य कसे बदलले पाहा.

चित्रपट 'डी'ने बदलले भाग्य

अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट 'डी'ची खूप चर्चा झाली. तेथून रणदीपला खूप ओळख मिळाली. हा चित्रपट रणदीपच्या करिअरचा टर्निंग पॉईंट होता. दाऊदच्या भूमिकेवर रिलीज झालेल्या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

रणदीपने सरबजीत चित्रपटासाठी इतके वजन कमी केले होते की, तो सेटवर बेशुद्धही झाला होता. सरबजीतसाठी रणदीपला स्टारडस्ट बेस्ट अभिनेत्याच्या ॲवॉर्डने गौरवण्यात आले होते.

अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे नाव 

रणदीप हुड्डाचे नाव इंडस्ट्रीच्या अनेक बड्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चित सुष्मिता सेन होती. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २ ते ३ ‍ वर्ष त्याने नीतू चंद्राला डेट केले होते. रणदीपचे नाव सुष्मिता सेनशीही जोडले गेले. याशिवाय अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लीजा हेडनसोबत त्याचे नाव जोडले गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news