Gadar 2 च्या चित्रपटगृहाबाहेर फेकले बॉम्ब, संशयिताला पकडले | पुढारी

Gadar 2 च्या चित्रपटगृहाबाहेर फेकले बॉम्ब, संशयिताला पकडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा चित्रपट गदर २ ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. गदर २ (Gadar 2) बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. ओपनिंग डेपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चलती आहे. आता पाटणाच्या एका चित्रपटगृहात चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरु होते तर चित्रपटगृहाबाहेर बॉम्ब स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. (Gadar 2)

एका रिपोर्टनुसार,  गदर 2 च्या तिकिटांच्या मोठ्या मागणीमुळे सिनेमा हॉलमध्ये गदारोळ झाला. त्यानंतर दोन संशयितांनी चित्रपटगृहाबाहेर कमी तीव्रतेचे बॉम्ब फेकले. यातील एका बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर संशयिताला पकडण्यात आले.

सिनेमा हॉलचे मालक म्हणाल्या, “वाईट हेतूने लोक आत येतात. आम्ही त्यांना चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करू द्यावा, असे त्यांना वाटत होते, जे आम्ही करू शकत नाही. आम्हाला प्रत्येक तिकीट जनतेला द्यायचे आहे. त्यांनी माझ्या कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सिनेमा हॉलचा स्टाफ कधीच कमकुवत नसतो. काहीही गंभीर घडले नाही. त्यांनी प्रयत्न केले. पण त्या सर्वांना पोलिसांनी पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली.”

Back to top button