Ishaan Khattar : इशानचा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन | पुढारी

Ishaan Khattar : इशानचा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची काळजी घेताना अभिनेता इशान खट्टर गेल्या काही दिवसांपासून दिसल्याने चर्चा रंगल्या होत्या. इशानने अवघ्या दहा वर्षाच्या वयात ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. याशिवाय इशानने एका आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन केल्याने चर्चेत आला होता. काल इशान खट्टरचा वाढदिवस ( Ishaan Khatter Birthday) होता. त्यामुळे जाणून घेवूयात त्याच्या करिअरमधील काही खास मनोरंजक गोष्टी….

इशानने फार कमी काळात आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत ‘धडक’ चित्रपटातून इशानने नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले. या चित्रपटाने इशानची स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्याने अगदी वयाच्या दहाव्या वर्षीच चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवले. पंरतु, पहिल्यादा काही काळात त्याला अपयशाला सामोरे जावे लागले.

इशानने २०१६ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात शाहीद कपूरच्या भावाच्या भूमिकेत दिसला. यानंतर त्याने ‘उडता पंजाब’ चित्रपटात कॅमिओचा रोल केला. याशिवाय २०१७ मधील ‘हाफ विडो’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका ईशानने साकारली. तसेच त्याने ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ चित्रपटातदेखील काम केले. इतक्या चित्रपटात मेहनत घेवूनही त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सुरूवातील ईशानला अपयशाच्या सामना करावा लागला.

यानंतर इशान बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतच्या ‘धडक’ चित्रपटात दिसला. यावेळी मात्र, इशानच्या करिअर चार चॉंद लागले. ‘धडक’ चित्रपट सुपरहिट ठरला. याशिवाय या चित्रपटातील अभिनयासाठी इशानला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

‘ए सूटेबल बॉय’ मालिकेतील सीनवरून वाद

‘धडक’ चित्रपटानंतर इशान अभिनेत्री तब्बूसोबत नेटफ्लिक्सवरील ‘ए सुटेबल बॉय’ या वेबसीरिजमध्ये दिसला. या मालिकेत इशान आणि तब्बू याच्यातील किसिंग सीन एका मंदिरात शूट करण्यात आला होता. यानंतर मात्र, मंदिरात किसिंग सीन शूट केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. हे प्रकरण खूपच त्याकाळी चर्चेत आले होते. या मालिकेत किंसिग सीन देणारी तब्बू अभिनेत्री इशानपेक्षा दुप्पट वयाची होती.

इशानचा जन्म १ नोव्हेंबर १९९५ रोजी मुंबईत झाला. काल इशानने त्याचा वाढदिवस ( Ishaan Khatter) उत्साहात साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री नीलिमा आझमी आणि राजेश खट्टर यांचा मुलगा इशान आहे. तसेच तो बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. इशानने संपूर्ण शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे. शाहिद कपूर आणि इशानचे अजुनही नातं घट्ट आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

Back to top button