विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ यादिवशी येतोय | पुढारी

विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' यादिवशी येतोय

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘यश राज फिल्म्स’ची आगामी कलाकृती द ग्रेट इंडियन फॅमिली (टीजीआयएफ) मध्ये विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शनासाठी तयार आहे.

विकी कौशल याचा अलीकडे प्रदर्शित झालेला जरा हटके जरा बचके तुफान गाजला. त्यामळे तो सध्या आपल्या करियरमध्ये चांगल्या ऊंचीवर आहे. त्यानंतर विकी या कौटुंबिक मनोरंजनपटाकडे वळला. या सिनेमाची कथा विकीच्या वेडपट कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कथेतील परिस्थितीनुरूप घोटाळा नियंत्रणाबाहेर जातो आणि कथेची रंगत वाढते!

विकीने आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केलीय. सोबतच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या धमाल कुटुंबाची ओळखही यातून होते. हा सिनेमा सर्वांसाठी मजेची पर्वणी आहे. विकी कौशल या अभिनेत्याचा आपल्या देशात मोठा चाहता वर्ग आहे, त्याने उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जीयां, जरा हटके जरा बचके अशा सिनेमांत उत्तम अभिनय साकारला!

आज हिंदी सिनेक्षेत्र सर्वोत्तम कंटेंटवर आधारीत आहे, विकी कौशल याने निवडलेले सिनेमे पाहिल्यास त्याचा कल कायमच उत्तम संहितांकडे असलेला दिसतो. अलीकडे प्रेक्षकांना चांगला सिनेमा पाहायचा असतो, द ग्रेट इंडियन फॅमिली ही नक्कीच एक अशी फिल्म ठरेल. विकी कौशलसारख्या हरहुन्नरी अभिनेत्यामुळे चांगला सिनेमा चर्चेत असेल!

Back to top button