पुढारी ऑनलाईन डेस्क : एल्विश यादव फेमस यू-ट्यूबर आहे, जो शॉर्ट चित्रपट बनवतो. (BB OTT 2 Winner Elvish Yadav ) यूट्यूबमुळेच तो खूप लोकप्रिय झाला. त्याची सुरुवात २०१६ पासून झाली होती. २५ वर्षाचा यूट्यूबर एल्विश यादव गुरुग्राम जवळील वजीराबाद गावचा आहे. त्याने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतलीय. (BB OTT 2 Winner Elvish Yadav )
एल्विशकडे दोन चॅनेल आहेत. एक 'एल्विश यादव व्लॉग्स' आणि दुसरा 'एल्विश नावाने. दोन्ही चॅनल्सवर ४.७ मिलियन आणि १० मिलियन सब्सक्रायबर आहेत. यूट्यूबर एल्विश यादवचे कुटुंबीय वजीराबाद गावात राहतात. तो फाउंडेशनदेखील चालवतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, तो 'सिस्टम क्लोदिंग'चा संस्थापक आहे.
एल्विशला लक्झरी लाईफसाठीदेखील ओळखले जाते. महागड्या गाड्यांचा तो शौकिन आहे. त्याने वर्ना, फॉर्च्युनर, पोर्श गाडी खरेदी केल्या आहेत. लक्झरी गाडीची किंमत १.७५ कोटी रुपये आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये त्याचे अनेक फ्लॅट आहेत.
शो संपताच एल्विशने मोठा खुलासा केला की, जियोच्या हेडने त्याला सांगितलं की, अखेरच्या १५ मिनिटांमध्ये वोटिंगमध्ये त्याला २८० मिलियन वोट्स मिळाले होते.
फिनाले निकालाची घोषणा करण्याआधी १५ मिनिटे लाईव्ह वोटिंग ठेवण्यात आले होते. येथे अभिषेक-एल्विशमध्ये मुकाबला पाहायला मिळाला.
एल्विश यादवने १ महिन्यात बिग बॉस जर्नीमध्ये संपूर्ण सिस्टिम हलवले. त्याच्यासमोर सर्व कंटेस्टेट मागे पडले. रिॲलिटी शो संपला. एल्विशने इतिहास बनवत शोची ट्रॉफी आपल्या नावे केली. शोच्या सेट बाहेर एल्विशचे फॅन्स प्रतीक्षा करताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला. यामध्ये एल्विश बीबी सेटमधून १००१ गाड्यांच्या ताफ्यासोबत बाहेर पडताना दिसला. १००१ गाड्यांच्या ताफ्यासह हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शेअर केला आहे.