पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार चिरंजीवीचा भोला शंकर आणि सुपरस्टार रजनीकांतचा जेलर या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करत आहे. (Jailer-Bhola Shankar) एकीकडे, जेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, भोला शंकरला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये. अनपेक्षितपणे चित्रपटाची कमाई म्हणावी तशी झालेली नाही. (Jailer-Bhola Shankar)
या रविवारपर्यंत पहिल्या आठवड्यात, जेलरने जवळपास २० कोटी कमावले. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे. त्यामुळे हा चित्रपट पुढील काही दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा आहे. एकूणच, जेलर चित्रपटाने वर्ल्डवाईड ३०० कोटींहून अधिक कमाई केलीय. परदेशात १२५ कोटींची कमाई झालीय. तामिळनाडूत ८५ कोटी रु., केरळ २३ कोटी, आंध्र ३० कोटी, कर्नाटक ३० कोटी आणि अन्य भारतभरातील राज्यामदंये १० कोटींचा बिझनेस केला आहे.
भोला शंकरने पहिल्या आठवड्यात निराशाजनक कमाई केली. वर्ल्डवाईड २४ कोटींची कमाई केली.