Don 3 : ११ मुल्‍कों की पुलिस ढूंढ़ती है ज‍िसे, पर…रणवीर सिंह झाला डॉन

don 3
don 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : फरहान अख्तरने 'गदर 2' रिलीज होण्यापूर्वीच इंडस्ट्रीत धमाका केला आहे. (Don 3) अखेर त्याने 'डॉन' फ्रँचायझीच्या 'डॉन ३' ची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी शाहरुख खान किंवा अमिताभ बच्चन नसून 'बाजीराव' रणवीर सिंह असणार आहे.  निर्मात्यांनी 'डॉन 3' च्या अधिकृत शीर्षक घोषणेचा टीझर देखील रिलीज केला आहे. जिथे रणवीर सिंहचा धमाकेदार लूकही पाहायला मिळाला आहे. (Don 3)

फरहान अख्तर 'डॉन 3' दिग्दर्शित करणार आहे. जिथे रणवीर सिंह त्याच्या आकर्षक लुक्स, अतुलनीय प्रतिभा आणि संस्मरणीय कामगिरीसह शैलीत परतला आहे. टीझरमध्ये त्याचे टेन्शन खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. रणवीर सिंहसाठी तो शाहरुख खानची जागा कसा घेतो हे खूप आव्हानात्मक असेल. मात्र, टीझरमध्ये रणवीरच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरणार आहे.

डॉन ३ मध्ये रोमाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरू झालीय. सोशल मीडियावर म्हटलं जात आहे की, कियारा आडवाणी 'डॉन ३' मध्ये रोमाच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळेच ती 'डॉन' चे निर्माता रितेश सिधवानीच्या ऑफिस बाहेर स्पॉट झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news