Made in Heaven Season 2 : पुलकित सम्राट-झोया अख्तर पुन्हा एकदा एकत्र | पुढारी

Made in Heaven Season 2 : पुलकित सम्राट-झोया अख्तर पुन्हा एकदा एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिभावान अभिनेता आणि दूरदर्शी दिग्दर्शक यांच्यातील समन्वयामुळे एक खास सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती म्हणजे “मेड इन हेवन 2” सगळेच प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत. यात अभिनेता पुलकित सम्राट खास भूमिका साकारणार आहे. पुलकित सम्राटने अत्यंत अपेक्षित “मेड इन हेवन 2” मधील (Made in Heaven Season 2) डॅशिंग सेलिब्रिटी म्हणून त्याच्या भूमिकेची पुनरावृत्ती केल्याने चाहत्यांना आता उत्सुकता आहे. डायनॅमिक जोडी पुन्हा एकदा या सीरिज मधून बघायला मिळणार आहे. (Made in Heaven Season 2 )

“मेड इन हेवन” च्या पहिल्या सीझनने चाहत्यांना प्रभावित केल्यानंतर पुलकित सम्राट दुसऱ्या सीझनसाठी सज्ज झालं आहे. आता त्याच्या भूमिकेसाठी चाहते उत्सुक असल्याचं कळतंय. दुसऱ्या सीझनमध्ये कोणते नवे ट्विस्ट येणार ? पुलकित कोणत्या नव्या अंदाजात दिसणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

“मेड इन हेवन 2” मध्ये पुलकित सम्राटच्या पुनरागमनाची तर आहे. “मेड इन हेवन 2” ची चर्चा जोरात सुरू असताना, चाहत्यांना “फुक्रे 3” मधील पुलकित सम्राटच्या आगामी प्रोजेक्ट साठी उत्सुकता आहे.

 

Back to top button