Bollywood Diva in Saree : वेस्टर्न आऊटफिटपेक्षा साडीमध्ये शोभतात ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री | पुढारी

Bollywood Diva in Saree : वेस्टर्न आऊटफिटपेक्षा साडीमध्ये शोभतात 'या' बॉलीवूड अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील अशा अभिनेत्री ज्यांनी त्यांच्या साडीतील लूकमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. विद्या बालन, रिताभरी चक्रवर्ती, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या ग्लॅमरस अभिनेत्रींचे साडीतील खास लूक पाहा. (Bollywood Diva in Saree) साडीच लालित्य हे अतुलनीय आहे आणि या बॉलीवूड अभिनेत्रींनी अनेक कार्यक्रमात साडीचे अनोखे आकर्षण दाखवले आहे. रेड कार्पेटपासून ते प्रमोशनल इव्हेंट्सपर्यंत, या अभिनेत्रींनी साडीच्या अनोख्या अदा दाखवल्या. (Bollywood Diva in Saree)

विद्या बालन

विद्या बालनचे या पारंपरिक पोशाखाबद्दलचे प्रेम तिच्या अनेक लूक्समधून दिसून येते. ती सहजतेने पारंपरिक साड्या पासून अगदी वेस्टर्न साड्यापर्यंत सगळ्यात कमाल दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

रिताभरी चक्रवर्ती

रिताभरी चक्रवर्ती ही खरी साडीची आवड असलेली अभिनेत्री आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या चांदीच्या टिकली वर्कने सुशोभित केलेल्या आणि नाजूक चांदीच्या अस्तराने सजवलेल्या काळ्या जॉर्जेट साडीत तिचा लूक उठून दिसतो.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाचा साडीचा लुक हा आधुनिक ठसठशीत दिसतो. हलक्या वजनाच्या, इथरीअल ऑरेंज शिफॉन साडीत ती नेहमीच सुंदर दिसते.

हुमा कुरेशी

हुमा कुरेशीची साडीची शैली ही नक्कीच अनोखी आहे. एक भव्य हस्तिदंतीच्या चांदीच्या सिक्विन साडीने तिचं मोहक रूप सगळ्यांना मोहित करून जात.

बॉलीवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री ज्यांनी साड्यांची मोहकता जपून आजवर फॅशन जगात आपला ठसा उमटवला आहे.

Back to top button