कंगना राणावत म्हणते त्या गोष्टीचा पश्चात्ताप नाही! | पुढारी

कंगना राणावत म्हणते त्या गोष्टीचा पश्चात्ताप नाही!

अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. कंगना एकेकाळी तिच्या पर्सनल लाईफमुळे खूपच चर्चेत होती. कंगनाचे नाव अनेक सेलिबि—टींसोबत जोडण्यात आले. अभिनेता अध्ययन सुमन याच्यासोबतही कंगना अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, पण दोघांचे नाते पुढे सरकू शकले नाही. अध्ययन आणि कंगना यांच्या ब—ेकअपला अनेक वर्षे झाली आहेत. 2017 मध्ये कंगनाबतच्या ब—ेकअपबद्दल सांगितले. तेव्हा त्याला टीकेचा सामना करावा लागला, पण त्यावेळी याबाबत सार्वजनिकरीत्या कबुली का दिली? याचा खुलासा त्याने आता केला आहे. अध्ययन म्हणाला, आमच्या नात्याबद्दल सार्वजनिकरीत्या कबुली दिल्याचा पश्चात्ताप मला होत नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. लोकांना दुसरी बाजू माहिती होती. ते केवळ दुसर्‍या बाजूबद्दल बोलू इच्छित होते आणि त्यानंतर चर्चा करायची होती. जेव्हा तुम्ही सार्वजनिकअसता तेव्हा अनेक मते असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट करणे फार गरजेचे असते. सध्या अध्ययनच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Back to top button