फातिमा शेख अजूनही भाड्याच्या घरात राहते! | पुढारी

फातिमा शेख अजूनही भाड्याच्या घरात राहते!

अभिनेत्री फातिमा शेख आता बॉलीवूडमधील संघर्षाविषयी बोलली आहे. बॉलीवूडमध्ये काम करूनही अद्याप भाड्याच्या घरात राहत असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच बॉलीवूडमधील संघर्षाविषयी तिने भाष्य केले आहे. फातिमा म्हणाली, मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत तळमजल्यावरील एका खोलीत राहत होते. हा तळमजला म्हणजे पार्किंग बेसमेंटचे घर बनवण्यात आले होते. तिथून मी आज जिथपर्यंत आले, त्याचा मला स्वत:वर अभिमान आहे. मी स्वत:चे घर घेण्यात अजून यशस्वी झाले नाही. मी अजूनही भाड्याच्या घरात राहते. पण हा संघर्ष करताना मला जे टप्पे पार करायचे होते, ते मी पार केले आहेत. मी पैशांसाठी काम करावे की थांबवावे, हा गुंता नेहमीचाच आहे. त्यामुळे तुमच्या गरजांप्रमाणे तुम्हीसुद्धा बदलत जाता.

Back to top button