20 Years Of Koi Mil Gaya : Hrithik Roshan चा ‘कोई मिल गया’ पुन्हा प्रदर्शित

Hrithik Roshan
Hrithik Roshan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा क्लासिक चित्रपट 'कोई मिल गया' ला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. (20 Years Of Koi Mil Gaya) आता ४ ऑगस्ट, २०२३ रोजी संपूर्ण शहरात आणि पीव्हीआर, आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. राकेश रोशन दिग्दर्शित आणि राहेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीति जिंटा आणि रेखा यांची मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (20 Years Of Koi Mil Gaya)

ही माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ८ ऑगस्ट, २००३ रोजी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हृतिक आणि एका एलियनच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारित होता. अभिनेत्री रेखा यांनी सोनिया मेहरा ही आईची भूमिका साकारली होती.

हृतिकने थप्पडला समजली होती चेष्टा

शूटिंग वेशी रेखा यांनी हृतिक रोशनला जोरदार थप्पड लावले होते. खरंतर रेखा यांनी हृतिकला याबाबत पूर्वसूचना दिली होती. पण, हृतिक ही चेष्टा वाटील. पण जेव्हा खरोखर थप्पड पडली, तेव्हा तो सून्न राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news