Made In Heaven-2 : अभिनेता पुलकित सम्राटची 'मेड इन हेवन २' मध्ये धमाकेदार एन्ट्री | पुढारी

Made In Heaven-2 : अभिनेता पुलकित सम्राटची 'मेड इन हेवन २' मध्ये धमाकेदार एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेड इन हेवन -2 चा ट्रेलर लाँच झाला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना या सीरिज च्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या सीरिजने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती आणि जगभरातील प्रेक्षकांना ही सीरिज आवडली होती. (Made In Heaven-2 ) शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ आणि कल्की कोचलिन यांच्यासह अभिनेता पुलकित सम्राट देखील या सीरिज मध्ये झळकणार आहे. उल्लेखनीय कामगिरीने पुलकित या सीरिजचा अविभाज्य भाग बनला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तो सज्ज आहे. (Made In Heaven-2 )

पहिल्या सीझनमधील एका भागामध्ये पुलकित सम्राटने त्याच्या करिश्माई कलाकृती ने एका सेलिब्रेटीची भूमिका साकारली होती आणि एका हटके ट्विस्ट आणि टर्नमध्ये तो दिसला होता. आता पुलकित काय भूमिका साकारणार याची प्रतीक्षा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
आकर्षक कथाकथन, दमदार परफॉर्मन्स आणि सामाजिक थीम्सच्या असलेल्या या सीरिजच्या नवा सीजनसाठी प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

Back to top button