Jawan Zinda Banda Song : 'जवान'चे पहिले गाणे रिलीज, जोशमध्ये थिरकला शाहरुख खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवानचे पहिले गाणे जिंदा बंदा रिलीज झाले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला होता. या लेटेस्ट ट्रॅकचे नाव जिंदा बंदा असे आहे. (Jawan Zinda Banda Song ) हे गाणे अनिरुद्ध रविचंदरने तयार केले आहे. तर लिरिक्स इरशाद कामिलने लिहिले आहेत. (Jawan Zinda Banda Song )
शाहरुखचा जोशपूर्ण डान्स
जवानमधील जिंदा बंदा गाणे एक फुट-टॅपिंग डान्स नंबर आहे. गाण्य़ात शाहरुख खान जोश आणि उत्साहाने डान्स करताना दिसत आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुखने जबरदस्त परफॉर्मन्स करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
१ हजार डान्सर्ससोबत शूट झालं गाणं
जवानच्या या गाण्यात शाहरुखच्या मागे बॅकग्राउंडमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट दिसत आहेत. शाहरुखने जिंदा बंदा हे गाणे १ हजार डान्सर्ससोबत शूट केलं. हिंदीसोबतच तमिळमध्ये वंधा एडम आणि तेलुगुमध्ये धूम्मे धूलिपेला नावाने रिलीज झाला.
दिग्दर्शक एटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. नयनतारा, दंगल फेम सान्या मल्होत्रा, विजय सेतुपति, रिद्धी डोंगरा या चित्रपटात दिसणार आहे.
कधी होणार रिलीज चित्रपट?
जवानमध्ये दीपिका पादुकोणचे स्पेशल ॲपीरियन्सदेखील आहे. याची झलक जवानच्या प्रीव्ह्यूमध्ये पाहायला मिळालं. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
- मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन, सोनू सूदने उघड केलं सत्य
- Sonu Sood : चाहत्यांची सोनूला अनमोल भेट
- Urfi Javed : ऊर्फीसारखे नमुने कोठून येतात?
View this post on Instagram