Sonu Sood : चाहत्यांची सोनूला अनमोल भेट | पुढारी

Sonu Sood : चाहत्यांची सोनूला अनमोल भेट

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही वर्षांत अभिनेता सोनू सूदने ( Sonu Sood ) अनेकांना मदत केल्याचे आपणास पाहायला मिळाले आहे. दरम्यान, समाजसेवी काम करत असताना तो चित्रपटातही व्यस्त आहे. त्याचा फतेह अंक्शन फॅक्ड’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना मदतीचा हात देऊन लाखो लोकांच्या हृदयात त्याने विशेष स्थान मिळवले आहे.

३० जुलै रोजी देशभरात सामान्य माणसाच्या या खच्या मसिहाचा खास वाढदिवस साजरा केला गेला. त्याच्या समाजसेवी कामांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या खास दिवशी समाजासाठी काही तरी विशेष करण्याचे ठरवले होते. गरजूंना मदत करण्याच्या सोनू सूदच्या अथक समर्पणाने प्रेरित होऊन चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम आयोजित केली.

जीवनाची अनमोल देणगी गोळा करण्यासाठी देशभरात सुमारे ८०० ते ९०० रक्तदान शिबिरे उभारण्यात आली होती. चाहत्यांचे हे काम केवल अभिनेत्यासाठी नव्हे तर लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या निःस्वार्थ वचनबद्धतेचे प्रतीक होते. तसेच सोनू सूदच्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसावेळी काही वंचितांना अन्नदानही केले. ( Sonu Sood )

हेही वाचा : 

Back to top button