Happy Birthday Sonu Sood : सोनू सूद गरिबांचा मसीहा कसा झाला?

sonu sood
sonu sood
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दबंग सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत तर असंख्य दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला सोनू सूदने माणुसकी काय असते, हे दाखवून दिले. (Happy Birthday Sonu Sood ) देशभरात त्याच्या नावाचा डंका वाजत राहतोय, तो त्याच्या मदतीच्या स्वभावामुळे. इतकचं नाही तर अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सोनू सूदने काही सामाजिक उपक्रम, फौंडेशन, शाळा आणि अन्य स्तूत्य उपक्रम राबवले आणि आताही त्याचे काम सातत्याने सुरुच आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक नागरिंकाना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवण्यासाठी सोनू सूद धाऊन आला होता. तेव्हापासून त्याला, गरिबांचा मसीहा म्हणून ओळखले जाऊ लागले. (Happy Birthday Sonu Sood )

सोनू सूद
सोनू सूद

कोरोना काळापासून आजतागायत आजपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभरातील लोकांसोबत जोडला गेलेला आहे. कुणाचे घर बांधायचे असो, कुणा रुग्णावर उचार असो, कुणाची नोकरीची समस्या असो सोनू सूद प्रत्येक कामासाठी धाऊन येतो. 'आप की अदालत' शोमध्ये सोनू सूदनेदेखील सांगितलं होतं की, सोशल मीडिया अकाऊंट हँडल करण्यासाठी त्याची कोणतीही टीम काम करत नाही. तो स्वत: सर्व ट्विट्सचे रिप्लाय करतो आणि लोकांशी संवाद साधतो. सोनू सूदच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचे झाले तर तो 'फतेह' मध्ये दिसणार आहे. सोनू बॉलिवूडचा खलनायक असवा तरी तो रिअल लाईफमध्ये हिरो आहे.

sonu sood
sonu sood

मदतीसाठी इतका पैसा येतो कुठून?

इंडिया टीव्ही वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूद 'आप की अदालत'मध्ये सहभागी झाला होता. तेव्हा जनतेने विचारलेल्या प्रश्नावर तो वकील रजत शर्मा यांच्यासमोर काय म्हणाला पाहा. अखेर इतकी मदत करायला सोनू सूद इतना पैसा आणतो कुठून? सोनू सूदला प्रश्न विचारण्यात आला की, इतक्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना लॉकडाऊनवेळी घरी पाठवण्यासाठी पैसे कुठून मिळाले?

sonu sood
sonu sood

उत्तरादाखल सोनू सूद म्हणाला, 'जेव्हा मी हे सर्व उपक्रम सुरू केले तेव्हा मला समजलं की, ज्या प्रकारची मागणी लोकांकडून येत आहे, त्यासमोर तुम्ही दोन दिवसदेखील टिकू शकत नाही. मी रुग्णालयात, डॉक्टरांना, कॉलेजना, शिक्षकांना, औषध कंपन्यांना प्रत्येकाला काम लावले. मी म्हणालो, मला ब्रँड अपीयरेंस हवा. मी फ्रीमध्ये काम करेन. तर तो जोडले गेले आणि ते आपोआप जोडले गेले. काही मोठ्या एनजीओने मला फोन रून सांगितलं की, सोनू देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. इतकं काम कसं सांभाळणार? मी म्हणालो, जो माझ्या घराच्या खाली येतो, मा त्याला नकार देऊ शकत नाही. आज जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत, कुठलाही लहान जिल्हा असो वा लहान राज्य, कुणीही, कुठेही, तुम्ही म्हणाल, मी कुणाला शिक्षण देऊ इच्छितो, कुणावर उपचार करू शकतो, कुणाला नोकरी देऊ शकतो, तुम्ही एक फोन कराल तर मी काम करून देईन.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news