Sonu Sood : सोनूने भोवळ आलेल्या महिलेला दिले पाणी | पुढारी

Sonu Sood : सोनूने भोवळ आलेल्या महिलेला दिले पाणी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेक लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला उत्तर देऊन सोनू त्यांना मदतही करतो. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये सोनूच्या घराबाहेर लोकांची गर्दी दिसत आहे. सोनूच्या घराबाहेर अनेक गरजू लोकांनी गर्दी केली आहे. हे लोक सोनूकडे मदतीची मागणी करत आहेत. सोनू या लोकांना मदत करण्याचे आश्वासनही देत आहे. या व्हिडीओत एक महिला भोवळ येऊन पडलेली दिसत आहे. या महिलेला सोनूने प्यायला पाणी दिले. सोनूने अनेकांना मदत केली आहे.

Back to top button