Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने आईच्या स्मरणार्थ सुरू केली खास शिष्यवृत्ती

sonu sood
sonu sood
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 नुकतीच लाँच करण्यात आली. (Sonu Sood) सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती 2023 ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. ही खास शिष्यवृत्ती अभिनेता सोनू सूदची यांची आई सरोज सूद यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात येते. (Sonu Sood)

अभिनेता सोनू सूदने त्याच्या निःस्वार्थ मदतीने महामारीच्या काळात "मसीहा" ही पदवी मिळवली आहे. लोकांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असलेला बेघरांना आश्रय देणारा, गरजूंसाठी एअरलिफ्टचे आयोजन करणारा सामान्य माणसाच्या सेवेसाठी कायम तत्पर असलेला हा अभिनेता!

' प्रो. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023' ही खास शिष्यवृत्ती मोहीम पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींद्वारे दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. सोनू सूद चॅरिटी फौंडेशन त्यांच्या उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा अनोखा हात आहे.

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करून आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. सोनू सूदने "पढाई आपकी, झिम्मेदारी हमारी" या अनोख्या विचार शैलीने ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. अर्जदारांनी त्यांच्या अटी व शर्तींनुसार विद्यापीठाने निश्चित केलेले निवड निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news