RARKPK Promo: ‘रॉकी और रानी…’चा नवा प्रोमो समोर (Video)

रणवीर सिंह -आलिया भट्ट
रणवीर सिंह -आलिया भट्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट आणि रणवीर सिंह सध्या रॉकी आणि रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहेत. दोघे आतापर्यंत अनेक शहरांमध्ये चित्रपट प्रमोशनसाठी गेले आहेत. दरम्यान, दिग्दर्शक करण जोहरनेदेखील रॉकी और रानी की प्रेम कहानीचा नवा प्रोमो रिलीज केलाय. (RARKPK Promo)

कसा आहे नवा प्रोमो ?

रानी (आलिया भट्ट) ला येताना पाहून रॉकी (रणवीर सिंह) न विचारताच आलिंगन देतो आणि म्हणतो, 'सेफ्टीसाठी पाहा भावाला सोबत घेऊन आलीय.' यावर आलिया म्हणते, हा तिचा भाऊ नाही तर कलिग (सहकारी) आहे.
रॉकीला कलिग या इंग्रजी शब्दाचा अर्थ समजत नाही. रणवीर म्हणतो, 'आईकडून की पप्पाकडून?' रॉकीची ही गोष्ट ऐकून तिच्यासोबत आलेला व्यक्ती आश्चर्य व्य्क्त करतो आणि राणी (आलिया) ला हसू येतं.

काय आहे चित्रपटाची कहाणी?

रॉकी और रानी की प्रेम कहानी एक फॅमिली ड्रामा आहे. चित्रपटात आलिया एका बंगाली मुलगी रानी आणि रणवीर पंजाबी मुलगा रॉकीच्या भूमिकेत आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये विलेन कुटुंबीय बनतात. रॉकी आणि रानी हार मानत नाहीत.

चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. आलिया-रणवीरसोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २८ जुलैला हा चित्रपट रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news