Aryan Khan Case : ड्रग्ज प्रकरणी मुनमुन धमेचाला सीबीआयचे समन्स | पुढारी

Aryan Khan Case : ड्रग्ज प्रकरणी मुनमुन धमेचाला सीबीआयचे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. काही महिन्यांनंतर त्याची जामीनावर सुका झाली. या संपूर्ण प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत होते. काही दिवसानंतर समीर वानखेडेंवर आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचे वृत्त समोर आले होते. वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणातीस समाविष्ट अभिनेत्री मुनमुन धमेचाला सीबीआयने समन्स पाठवले आहे.

आर्यन खानला जेव्हा अटक झाली होती, त्याच जहाजातून आर्यन खानसोबत मॉडेल, अभिनेत्री मुनमुन धमेचालाही अटक करण्यात आली होती. सीबीआयने आता मुनमुन धमेचाला समन्स जबाब नोंद‍वण्यासाठी आणि समीर वानखेडे प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. ऑक्टोबर, २०२१ मध्ये मुनमुन धमेचाला ड्रग्ज बाळगल्याप्रकणी अटक झाली होती.

रिपोर्टनुसार, मुनमुन धमेचाला २० जुलै रोजी सीबीआय समोर हजर राहण्यास सांगितले आहे.

 

Back to top button