पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे अण्णा सुनील शेट्टी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वत: माफी मागितली आहे. (Tomato prices) टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर सुनील शेट्टीने असं काही सांगितलं की, देशातील शेतकरी नाराज झाले. ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर सुनील शेट्टीने आता स्पष्टीकरण दिलं आहे. (Tomato prices)
एका न्यूज पोर्टलच्या मुलाखतीत सुनील शेट्टीने वाढत्या टोमॅटोच्या किंमतीवर बोलताना म्हटले होते की, याचा परिणाम त्याच्या स्वयंपाक घरावरही पडत आहे. सुनील शेट्टी म्हणाले की, त्यांनी टोमॅटो खाणे कमी केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. हे स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शेतकऱ्यांनी त्याची निंदा केली. इतकचं नाही तर रिपोर्टनुसार, सामाजिक कार्यकर्ता आणि किसान संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीवर टीकाच केली नाही तर टोमॅटोदेखील पाठवले.
सुनील शेट्टीने आपले स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांची माफी मागितली. शेट्टी म्हणाला की, तो शेतकऱ्यांचे समर्थन करतो. त्यांच्याविषयी नकारात्मक विचार देखील करू शकत नाहीत. सुनील शेट्टी म्हणाला की, तो नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो. आणि देशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. तो म्हणाला, "शेतकरी माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहेत. एका हॉटेल बिझनेसमॅनच्या रूपात नेहमीच संबंध त्यांच्यासोबत राहील. जे मी म्हटलेलं नाही, पण त्यांच्या भावना दुखावल्या, मी माफी मागतो. कृपया माझे बोलणे चुकीच्या पद्धतीने घेऊ नये."