Gigi Hadid : गांजा सापडल्याने सुपरमॉडल गिगी हदीदला आधी अटक नंतर जामीनावर सुटका | पुढारी

Gigi Hadid : गांजा सापडल्याने सुपरमॉडल गिगी हदीदला आधी अटक नंतर जामीनावर सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूडची सुपरमॉडल गिरी हदीदला विमानतळावर अटक करण्यात आली आहे. (Gigi Hadid) रिपोर्ट्सनुसार, तिच्या बॅगेतून गांजा जप्त करण्यात आला आहे. (Gigi Hadid)

रिपोर्टनुसार, सुपरमॉडेल गिगी हदीदच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात चांगली झाली नाही. कस्टम अधिकार्‍यांना त्यांच्याकडे गांजा सापडल्यानंतर हदीद आणि तिची मैत्रीण लीह मॅककार्थीला (Leah McCarthy) अटक करण्यात आली. हदीद आणि तिचा पाल एका खासगी विमानाने आल्यानंतर काही वेळातच, कस्टम अधिकार्‍यांना त्यांच्या सामानात “गांजा आणि गांजा खाण्यासाठी वापरलेल्या वस्तू” आढळून आल्या.

१० जुलैला ती आपल्या मित्रांसोबत केमॅन आयलँड्सच्या प्रवासावर होती. त्यावेळी तिच्या बॅगेत गांजा सापडल्याने गिगीला ओवेन रॉबर्ट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते.

लियोनार्डो डिकॅप्रियो करतेय डेट

१२ जुलै २०२३ रोजी गिगी आणि तिची मैत्रीण कोर्टात हजर झाली. अधिकाऱ्यांनी तिला आरोपांसाठी दोषी ठरवलं. या आरोपासाठी गिगी आणि तिच्या मैत्रीणीवर एक हजार डॉलर दंड लावण्यात आला. त्यानंतर त्यांना जामीनावर सुटकार करण्यात आली. रिपोर्टनुसार, गिगी अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोला डेट करत आहे. दोघेही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते.

Back to top button