Tamannaah Bhatia : तमन्ना – विजय वर्माच्या केमिस्ट्रीचे रहस्य काय ? | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्ना - विजय वर्माच्या केमिस्ट्रीचे रहस्य काय ?

पुढारी ऑनलाईन : मागील महिन्यात तमन्नाशी ( Tamannaah Bhatia ) केमिस्ट्री जुळत असल्याची विजय वर्माने जाहिर कबुली दिल्यानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिली. पण, खरोखरच ही जोडी प्रेमात आहे की हा पब्लिसिटी स्टंट आहे प्रश्न निर्माण झाला होता. तो आता विजय वर्मानेच निकालात काढला आहे.

‘मी माझ्या पडद्यावरील व्हिलन एमधून बाहेर पडलो असून आता रोमँटिक फेजचा आनंद घेत आहे’, असे विजय वर्माने अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे. तमन्ना व विजय वर्मा लस्ट स्टोरीज २’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले, असे सांगितले जाते.

यापूर्वी तमन्नाला विजयशी अफेअरबाबत विचारले गेले, त्यावेळी तिने अतिशय सावध पवित्रा घेतला होता. ती त्यावेळी म्हणाली होती, आपण एखाद्या सहकलाकारांसोबत काम केले म्हणून आकर्षण वाटेल, असे अजिबात नसते. मी अनेक कलाकारांसह काम केले आहे आणि आपल्या भूमिकेबाबत समर्पित असणे हा माझा प्राधान्यक्रम असतो.

हेही वाचा : 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Back to top button