Tamannaah Bhatia : चाहत्याने असे काही केले की तमन्नाने…(Video) | पुढारी

Tamannaah Bhatia : चाहत्याने असे काही केले की तमन्नाने...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलाकार आणि त्यांचे चाहते हे जगभरात असतात चाहत्यांच प्रेम हे कायम कलाकारांना मिळत असत. पण अशा एका फॅन मोमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. (Tamannaah Bhatia ) अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला “जी करदा ” रिलीज झाल्यानंतर तिच्या चाहत्यांच्य खूप प्रेम मिळालं. तिच्या अभिनयाचं कौतुकदेखील झालं. सध्या ती तिच्या लस्ट स्टोरीज २ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिच्या एका चाहत्याने एक खास गोष्ट करून तिचं लक्ष वेधून घेतलं. (Tamannaah Bhatia )

या फॅनने चक्क तमन्नाचा टॅटू गोंदवून घेतला आणि या खास फॅन मोमेंटने तमन्ना हळवी होऊन तिला अश्रू अनावर झाले. नुकतेच मुंबई विमानतळावर आल्यावर तमन्नाचे एका डाय-हार्ड चाहत्याने स्वागत केले. चाहत्याने तमन्नाचा तेजस्वी चेहरा त्याच्या हातावर टॅटू करून घेतला, “लव्ह यू तमन्ना” अस लिहिलेल्या या खास टॅटूने तिचं मन जिंकून घेतलं.

तमन्ना भाटियावरील चाहत्याचे प्रेम हे अतूट आहे. या खास आणि तितक्याच हळव्या गोष्टीने तिला अश्रू अनावर झाले. या चाहत्याने अभिनेत्रीच्या पायांना स्पर्श करून आणि तिला फुलांचा गुच्छ आणि मनापासून पत्र देऊन देऊन तिला चकित केलं. भावनांनी भारावून गेलेल्या तमन्नाने चाहत्याला आलिंगन देत मनापासून “धन्यवाद” म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.

तमन्ना भाटियाचा नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज २ चर्चेत आहे. आगामी अॅक्शन-पॅक एंटरटेनर भोला शंकर या चित्रपटातही ती प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. याव्यतिरिक्त, तमन्नाकडे बांद्रा आणि जेलर या चित्रपटात काम करणार आहे.

(video – Viral Bhayani insta )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button