पुढारी ऑनलाईन डेस्क : समार वानखेडेंवर आर्यन खान क्रुझ ड्रग्ज प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे आणि अन्य चार जणांनी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितली होती. (Sameer Wankhede) दरम्यान, समीर वानखेडेंनी पलटवार केला. 'सरकारी सेवक म्हणून मी लाच घेतल्याचा आरोप 'सीबीआय'ने लावला आहे. मग सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे लाच देणाराही आरोपीच ठरतो. मग, त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे म्हणणे समीर वानखेडेंनी बुधवारी उच्च न्यायालयात माडंले. (Sameer Wankhede)
'एनसीबी'चे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी न्यायालयाकडून याचिका दुरुस्ती करण्याची मुभाही मिळवली. आपल्या याचिकेत हा मुद्दा समाविष्ट करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी त्यांनी मागितला. आता २० जुलैपर्यंत वानखेडेंना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला बाहेर काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने समीर वानखेडेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.