Bigg Boss OTT 2: किस वर किस! मनीषा रानीने अब्दु रोजिकला जबरदस्ती केलं किस | पुढारी

Bigg Boss OTT 2: किस वर किस! मनीषा रानीने अब्दु रोजिकला जबरदस्ती केलं किस

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीजन २’ मध्ये किसचा किस्सा संपतच नाहीये. (Bigg Boss OTT 2) आधी आकांक्षा पुरी-जद हदीदने एकमेकांना लिप किस केलं होतं. यानंतर मोठी चर्चा झाली होती. आता बिग बॉसच्या घरात अशीच एक घटना झाली आहे, जे पाहून नेटकरी भडकले आहेत. अब्दु रोजिकला मनीषा रानीने जबरदस्तीने किस केलं. हे पाहून सोशल मीडियावर अब्दुचे फॅन्स मनीषाला खरंखोटं ऐकवत आहेत. (Bigg Boss OTT 2)

शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की, मनीषा रानीने एका टास्कच्या दरम्यान जबरदस्ती अब्दु रोजिकला किस करत आहे. अब्दु या शोमध्ये गेस्ट बनून आला होता. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याला बिग बॉसने चार नॉमिनेटेड कंटेस्टेंट्स सोबत शॉर्ट डान्स व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हटले होते. या टास्क दरम्यान मनिषाने अब्दुला अनेकवेळा किस केलं. यावेळी अब्दुला खूप अस्वस्थ वाटत होतं. तरीही तो स्माईल करत राहिला.

अब्दु या टास्कसाठी जद हदीद, मनीषा रानी, अविनाश सचदेव आणि जिया शंकरला निवडतात. तो मनीषासोबत जकूजीमध्ये व्हिडिओ बनवतो. दोघे डान्स करतात, पोज देतात. त्यावेळी मनीषा त्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करते. ती अब्दुलादेखील म्हणते की, त्याने तिच्या गालावर किस करावे. परंतु, अब्दु यावेळी संकुचित होताना दिसतो आणि तो आपला चेहरा दूर करतो.

या प्रकारामुळे मनीषा ट्रोल 

अब्दुसोबत जे काही घडले, त्यामुळे मनीषावर युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘मनीषा रानीने फुटेजसाठी असं केलं. सर्व मर्यादा ओलांडल्या’. दुसऱ्या युजरने ट्विट केलं, ‘ती लकी आहे की अब्दु रोजिकने थप्पड नाही मारली किंवा धक्का दिला नाही. जर अब्दुने असं केलं असतं तर त्याचं करिअर संपुष्टात आलं असतं.’

Back to top button