BBM-3 : स्वत:ची चूक मान्य कर मीनल- विकास | पुढारी

BBM-3 : स्वत:ची चूक मान्य कर मीनल- विकास

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “स्वर्ग की नरक” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये स्वर्गात कोण जाणार आणि नरकामध्ये कोण जाणार हा निर्णय संपूर्णपणे दादूस यांचा होता ज्यांना तीन सल्लागार देखील देण्यात आले होते विशाल, स्नेहा आणि गायत्री. ज्यामध्ये काल मीनल शाह आणि विकास जेव्हा आपली बाजू मांडायला आले तेव्हा विशाल याने सल्लागार म्हणून त्याचे परखड मत मांडले. जे कुठेतरी विकासला अजिबात आवडले नाही. कारण विकासच्या मते विशालचा बालिशपणा त्यामधून कुठेतरी दिसून आला. विकासने मीनल शाह चूक मान्य करण्यास सांगितले.

त्याच्या विरोधात मुद्दे शोधले जात आहेत असे देखील त्याला वाटले. काल विकास या झाल्या प्रकारामुळे भावूकदेखील झाला. त्याला अश्रू अनावर झाले. विशालने असे वागणे आणि बोलणे त्याने कधीच एकस्पेक्ट केले नव्हते. विशाल याचविषयी विकासशी बोलणार आहे.

विशाल विकासला म्हणाला, मला माझं मतं मांडायचे होते ना विकास. विकास म्हणाला, गायत्री माझ्या बाजूने बोलली मग ती जास्त चांगली आहे माझ्यासाठी. शाह आणि विशालचं म्हणणं पडलं ठीक आहे. मग तू तसा विचार कर. विकास म्हणाला, तुम्ही माझ्याविरोधात बोलत आहेत. विशाल तू विरोधात नाही. तू विरोधात मुद्दे तयार केले आणि बोललास. तू आधीच ठरवलं होतंस तसं. शाह आणि विशाल म्हणाले असं नाहीये, तुझा अविश्वास दिसून येतं आहे. तू prove केलं.

विकास म्हणाला, मी तुझ्या विरोधात कधीच काही बोलो नाही, तू माझ्या विरोधात बोलीस, कधीतरी अॅक्सेप्ट कर. तू स्वत:ची चूक मान्य कर. शाह म्हणाली, तू आता बोलतो आहेस सगळीकडे बोल तू…”

तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button