Shilpa Shetty : लंडनमधील व्हेकेशननंतर शिल्पा मुंबईत परतली | पुढारी

Shilpa Shetty : लंडनमधील व्हेकेशननंतर शिल्पा मुंबईत परतली

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं तिने यंदाचा वाढदिवस लंडनमध्ये खास सेलिब्रेट केला. बॉलिवूड अभिनेत्रीने आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आणि ती एकटीच लंडनवरून का आली? (Shilpa Shetty) यावर सगळ्यांना प्रश्न पडला आहे. मुंबई विमानतळावरील शिल्पाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिचे कुटुंब तिच्यासोबत का आले नाही? शिल्पा एकटीच मुंबईत का आली ? अशा अनेक चर्चा होत आहेत. (Shilpa Shetty)

फॅमिली टाईम आणि मस्त ट्रीप संपवून शिल्पा आपल्या नव्या कामासाठी पुन्हा एकदा मुंबईत आल्याचं समजतंय. कामाला प्राधान्य देत शिल्पा शेट्टी मुंबईत आली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट (IGT) च्या आगामी शूटिंग शेड्यूलसाठी ती आली आहे असं समजतंय. या रिअॅलिटी शोचे शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर ती पुन्हा लंडनला परतणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारताच्या गॉट टॅलेंटचा अविभाज्य भाग आहे आणि पॅनेलवरील तिच्या उपस्थितीने नक्कीच शो मध्ये एक अनोखा अंदाज बघायला मिळतो. IGT शिवाय शिल्पा कन्नड चित्रपट KD आणि सोनल जोशीचा सुखी या चित्रपटात दिसणार आहे.

Back to top button