Anil Kapoor : “वो सात दिन ते ग्लोबल स्टारडम”, ४० वर्षांचा अखंड प्रवास | पुढारी

Anil Kapoor : "वो सात दिन ते ग्लोबल स्टारडम", ४० वर्षांचा अखंड प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरा सुपरस्टार म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. नुकतेच चित्रपट कारकिर्दीतील ४० वर्ष त्यांनी साजरी केली. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. (Anil Kapoor ) ऑनस्क्रीन अभिनय करून ज्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची कायम मन जिंकून घेतली. अशा अनिल कपूर यांच्या अतुलनीय प्रवासाची ही ४० वर्ष आहेत. प्रत्येक भूमिका अगदी लीलया पार पाडत त्यांनी प्रेक्षकांचे गेली ४० वर्ष नॉन स्टॉप मनोरंजन केलं. अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घालत ४० वर्षे पूर्ण केली. (Anil Kapoor)

नॉस्टॅल्जिक होऊन अभिनेता अनिल कपूरने त्याचे पहिले हिंदी चित्रपट “वो सात दिन” मधील खास क्लिपची एक झलक इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केली. ज्यात त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत प्रेक्षकांचे आभार मानले. आपल्या जबरदस्त भावना व्यक्त करताना अनिल यांनी लिहिले- “आज मी एक अभिनेता आणि एक मनोरंजनकर्ता म्हणून ४० वर्षे पूर्ण करत आहे. ४० वर्षे तुम्हा प्रेक्षकांनी मला स्वीकारले, प्रेम दिलं! मी जिथे आहे तेच मला करायचे आहे आणि हेच कायम करत राहायचं आहे.”

अनिल कपूरने त्यांचे दिवंगत गुरू बापू साब तसेच त्यांचे बंधू बोनी कपूर आणि त्यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल लिहिलं. ज्यांनी त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि ‘वो सात दिन’मध्ये त्यांना पहिली संधी दिली. अभिनेत्याने दिग्गज नसीरुद्दीन शाह आणि मोहक पद्मिनी कोल्हापुरे यांचे मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. अनिल यांच्या स्टारडम मागे असलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार अनिल यांनी मानले.

अनिल कपूरचा अतुलनीय प्रवास चार दशकांचा आहे आणि अभिनयाचा हा सिलसिला अजूनही अखंडितपणे सुरू आहे. यामध्ये १०० हून अधिक चित्रपट आहेत. त्यांचा करिष्मा आणि अमर्याद अभिनय कौशल्याने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अनिल यांच्या ४० वर्षांचा प्रवास साजरा करत असताना ते आगामी ‘द नाईट मॅनेजर पार्ट-२,’ ‘अॅनिमल’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

Back to top button