Karishma Tanna : करिश्मा केदारनाथमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली… | पुढारी

Karishma Tanna : करिश्मा केदारनाथमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

बॉलीवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या उघडपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यातील एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा तन्ना ! करिश्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. करिश्माने इन्स्टाग्रामवर केदारनाथमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने ‘आमच्या पवित्र देवभूमीला हजारो मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा!’, असे म्हटले आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण म्हणजे केदारनाथ.

सुमारे 3 हजार 538 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जगभरातून लाखो भाविक येतात. यात गौरी कुंड ते केदारनाथ धाम मंदिरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. लांबचा पल्ला असल्यामुळे अनेक जण घोडे किंवा डोलीच्या माध्यमातून मंदिरापर्यंत पोहोचतात. मात्र, या प्रवासात अनेकवेळा घोड्यांना मृत्युमुखी पडावे लागते. त्यामुळेच करिश्मा म्हणाली, जेव्हा हे प्राणी तुम्हाला स्वत:च्या पाठीवर बसवून तीर्थयात्रेला घेऊन जातात. त्यावेळी त्यांना प्रचंड शारीरिक त्रास होत असतो. पण, तरीही तुम्हाला त्यांचा त्रास दिसत नाही का? तुम्ही देवाचे दर्शन घेत असताना तुमच्यामुळे एका जीवाचे प्राण जात आहे हे तुम्हाला दिसत नाही का? तीर्थयात्रेला जाऊन तुम्ही पाप करून येताय. किमान आता तरी जागे व्हा आणि स्वत:च्या पायाने चालत जाऊन देवदर्शन करा.

 

Back to top button