‘आदिपुरुष’च्या बंदीवर तात्काळ सुनावणीस दिल्ली हायकोर्टाचा नकार | पुढारी

'आदिपुरुष'च्या बंदीवर तात्काळ सुनावणीस दिल्ली हायकोर्टाचा नकार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा – दिल्ली दिल्ली हायकोर्टाचे ‘आदिपुरूष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आहे. याचिकेवर ३० जून रोजी सुनावणी घेण्यात येईल. तात्काळ सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदू सेनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यासंदर्भात माहिती नव्हती का? असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला.

चित्रपटात अनेक आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा ‘टिजर’ आल्यानंतर वादास्पद भाग हटण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, संबंधितांनी आश्वासन पाळले नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला. चित्रपटामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधावरही प्रभाव पडतोय. नेपाळमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, असे याचिकाकर्त्याकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

दिल्लीतील काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. महाकाव्य रामायणातील तथ्यांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत हिंदू बांधवांच्या भावनांना दुखावण्यात आल्या आहेत, असा दावा केला जातोय. युनायटेड हिंदू फ्रंट आणि राष्ट्रवादी शिवसेनेने दिल्लीतील एका मॉलबाहेर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करीत आंदोलनही केले होते.

Back to top button