

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांना ज्याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती तो बहुचर्चित ट्रेलर आज लाँच झाला आहे. प्रतिभावन अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या "लस्ट स्टोरीज 2" चा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहत्यांना या ट्रेलरची सर्वाधिक उत्सुकता होती आणि आज या ट्रेलर ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. तमन्ना भाटियाला या सीरिजमध्ये बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
तमन्ना भाटिया तिच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असते. "जी कारदा" मधल्या तिच्या जबरदस्त अभिनयाने ती पुन्हा चर्चेचा विषय ठरली आणि आता लवकरच लस्ट स्टोरीज 2 मध्ये ती झळकणार आहे.
"लस्ट स्टोरीज 2" च्या सोबतीने तमन्नाकडे अनेक नवीन प्रोजेक्ट्स आहेत. प्रेक्षक तिला आगामी चित्रपट "वांद्रे" मध्ये पाहण्यासाठी उत्सुक तर आहेत शिवाय ती तेलगू चित्रपट "भोला शंकर" आणि तमिळ चित्रपट "जेलर" मध्ये देखील दिसणार आहे.
"लस्ट स्टोरीज 2" च्या ट्रेलर ने सोशल मीडियावर तमन्नाच्या भूमिकेबद्दल चर्चा होताना दिसतेय. आता तिला या सीरिजमध्ये बघण्यासाठी सगळेच वाट बघत आहेत.