Jee Karda : तमन्ना भाटियाने दिले इंटिमेट सीन, टीका होताच सोडले मौन

तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ची नवी वेबसीरीज जी करदा (Jee Karda) आता ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. या सीरीजमध्ये तमन्नाने अनेक लव्ह मेकिंग आणि इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली. या टीकेवर तमन्नाने मौन सोडले आहे. दुसराकडे तिच्या चाहत्यांना ही सीरीज आवडली. तशी प्रतिक्रिया चाहते सोशल मीडियावरून देत आहेत.

तमन्ना म्हणाली, हे सीन्स कोणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वा प्रसिद्धीसाठी घेतले नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिप ड्रामाला पाहता, तेव्हा असे सीन महत्वपूर्ण भाग आहेत. कारण हेच सत्य आहे. लोकांना हे आवडो अथवा न आवडो. सुहैल असे व्यक्ती होते, ज्यांच्यासोबत मी कम्फर्टेबल आहे. ते सीन्स करताना मला कोणत्याही प्रकारची लाज अथवा खंत वाटली नाही.

बोल्ड अंदाजात तमन्ना भाटिया

जी कारदामधील तमन्ना भाटियाच्या उत्कृष्ट अभिनयानंतर चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. या वेब शो ला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. तमन्ना भाटियाच्या बॅक टू बॅक प्रोजेक्ट्सने तिचे चाहते खुश झाले आहेत. नुकतेच तिची जी कर दा वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. त्यामुळे पुन्हा एकदा तमन्ना चर्चेत आली. १५ जून रोजी पदार्पण झाल्यापासून जी कारदा या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. तमन्नाला तिच्या अभिनयासाठी अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, "किती आकर्षक मालिका होती. मी ती पाहिली ❤️@tamannaahspeaks फक्त व्वा, संपूर्ण शोमध्ये विलक्षण दिसत आहे❤️

काय पंजाबी लहजा आहे, एकदम मस्त पंजाबी मुंडा म्हणून बघायला खूप मजा आली?गाणी शोच्या वातावरणाशी अगदी जुळत होती. दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले, "रोमांस कॉम्प्लेक्स होता है. लेखन आणि परफॉर्मन्स खूप छान एकत्र! #JeeKarda @MaddockFilms. आणखी एका चाहत्याने टिप्पणी केली, "निःसंशयपणे मी अलीकडच्या काळात पाहिलेली एक उत्कृष्ट मालिका….

दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले, "अरे तमन्ना तू अफलातून काम केलं आहेस. आम्हाला लवकरात लवकर सीझन बघायचा आहे. @tamannaahspeaks #JeeKardaOnPrime"

तमन्नाला सोशल मीडिया वर खूप प्रेम मिळालं. तिचे चाहते लस्ट स्टोरीज 2 मध्ये तिची आतुरतेने वाट पाहत आहेत जे २९ जून रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय, तिचा मल्याळम भाषेत "बांद्रा", तेलुगुमध्ये "भोला शंकर" आणि तमिळमध्ये "जेलर" हा चित्रपट सलग रिलीज होण्याच्या तयारीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhail N (@suhailnayyar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news