Adipurush Box Office Collection : प्रभासच्या आदिपुरुषला मिळाली ग्रँडओपनिंग; पहिल्या दिवशी १४० कोटींची बंपर कमाई | पुढारी

Adipurush Box Office Collection : प्रभासच्या आदिपुरुषला मिळाली ग्रँडओपनिंग; पहिल्या दिवशी १४० कोटींची बंपर कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन इंडिया स्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रामायणाच्या कथेवर आधारित या आधुनिक पटकथेच्या रुपांतराला चाहत्यांनी ज्या खुलेपणाने स्वागत केले ते पाहण्यासारखे आहे. ‘आदिपुरुष’ची आगाऊ बुकिंग पहिल्याच दिवशी चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळणार असल्याचे संकेत देत होती. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक ग्रँड ओपनिंग मिळाली आहे. (Adipurush Box Office Collection)

शुक्रवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रिपोर्ट्स यायला सुरुवात झाली आहे. प्रभासच्या स्टारडमच्या जोरावर बॉक्स ऑफिसचा मोठा पल्ला गाठू पहाणाऱ्या ‘आदिपुरुष’ने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कमाई केल्याचे संकेत मिळत आहेत. जर आपण ‘आदिपुरुष’ च्या कलाकारांवर नजर टाकली तर प्रभास व्यतिरिक्त क्रिती सेनॉन, सैफ अली खान किंवा सनी सिंग असे कलाकार आहेत जे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंगसाठी ओळखले जात नाहीत. प्रभास हिरो असण्यासोबतच त्याचे पॅन इंडिया फॅन फॉलोइंग देखील आहे. त्याचा काय प्रभाव आहे हे या चित्रपटाच्या कमाईचे आकडेच बोलत आहेत. (Adipurush Box Office Collection)

हिंदी पेक्षा तेलगु आवृत्तीत मोठी झेप (Adipurush Box Office Collection)

‘बाहुबली’ द्वारे हिंदी प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान पक्के करणाऱ्या प्रभासला त्याच्या तेलुगू मार्केटमध्येही खूप प्रेम मिळत आहे. ‘आदिपुरुष’चे ओपनिंग कलेक्शन असे संकेत देत आहे की, हिंदी पेक्षा अधिक कमाई चित्रपटाच्या तेलगु आवृत्तीने केलेली पहायला मिळत आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपट बनवल्यामुळे टीका होत असली तरी बॉक्स ऑफिसवरील कमाई त्याच्यासाठी एक मोठी भेट घेऊन आली आहे. पहिल्याच दिवशी लोकांमध्ये या चित्रपटाची एवढी क्रेझ होती की बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठे विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. (Adipurush Box Office Collection)

याच वर्षी, शाहरुख खानच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाने नवे रेकॉर्ड रचले होते. आता प्रभासच्या ‘आदिपुरुष’नेही त्याच मार्गावर चालत नवे रेकॉर्ड नोंदवायला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वी हिंदी आवृत्तीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, चित्रपटाने त्या अपेक्षेसह इतर भाषेतील आवृत्तीमध्येसुद्धा नव-नवे रेकॉर्ड नोंदवले आहेत. (Adipurush Box Office Collection)

बॉलीवूडमधील सर्वात मोठे ओपनिंग

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये निर्मात्यांनी प्रदर्शित केला. या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक विक्रम केला, ज्यात बॉलीवूडसाठी हिंदी आवृत्तीत (Hindi version) ओपनिंगच्या विक्रमाचा समावेश आहे. ‘पठाण’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ५५ कोटींची कमाई केली. तर ३७.२५ कोटींच्या कलेक्शनसह, ‘आदिपुरुष’ने लॉकडाऊननंतर बॉलीवूडला दुसरी सर्वात मोठी ओपनिंग मिळवून दिली आहे.

पॅन इंडिया कलेक्शन रेकॉर्ड

पण प्रभासच्या चित्रपटाने खरी कमाल पॅन इंडिया कलेक्शनमध्ये केली आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार शुक्रवारी ‘आदिपुरुष’चे नेट इंडिया कलेक्शन ८६.७५ कोटी रुपये होते. तर एकूण कलेक्शन १०२ कोटींहून अधिक आहे. म्हणजेच ‘आदिपुरुष’ हा १०० कोटींचा ऑल ओव्हर इंडिया ग्रॉस कलेक्शन करणारा बॉलिवूड इंडस्ट्रीतील पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी हा विक्रम शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या नावावर होता ज्याची भारतातील कमाई जवळपास ६८ कोटी रुपये होती.

प्रभासची जबरदस्त क्रेझ

लॉकडाऊननंतर बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदीतील ‘आदिपुरुष’ची सुरुवात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रभासचा चित्रपट हा आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये १० वा सर्वात मोठा ओपनिंग हिंदी चित्रपट ठरला आहे. पण चित्रपटाला १०० कोटींची कमाई करण्यात प्रभासच्या पॅन इंडिया स्टारडमचाही खरा हात आहे. तेलुगु इंडस्ट्रीमधून आलेल्या प्रभासचा तेथे खूप मोठा चाहता वर्ग आहे. ‘आदिपुरुष’च्या सुरुवातीच्या कलेक्शनने तीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

‘आदिपुरुष’च्या तेलुगू व्हर्जनची सर्वाधिक कमाई

‘आदिपुरुष’च्या तेलुगू व्हर्जनने (Telugu version) हिंदी व्हर्जनपेक्षा १० कोटी रुपयांची अधिक कमाई केली आहे. Sacknilk च्या अहवालात म्हटले आहे की ‘आदिपुरुष’ च्या तेलुगू आवृत्तीने पहिल्या दिवशी ४८ कोटींचे निव्वळ कलेक्शन केले आहे. एकाच वेळी दोन मोठ्या मार्केटमध्ये एवढा मोठा कलेक्शन करणं ही कोणत्याही स्टारसाठी मोठी गोष्ट आहे.

१४० कोटींची बंपर कमाई

अधिकृतपणे, ‘आदिपुरुष’चे जगभरातील एकूण संकलन १४० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनपासून सुस्त असलेल्या बॉक्स ऑफिससाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जिथे शाहरुखच्या ‘पठाण’ने जगभरात १०६ कोटींचा ग्रॉस कलेक्शन मिळवले होते. तिथे ‘आदिपुरुष’ने १४० कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रभासचा ‘आदिपुरुष’ आता भारत आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडसाठी सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. मात्र, हिंदी आवृत्तीत ‘पठाण’चा विक्रम आजही कायम आहे.


अधिक वाचा :

Back to top button