पुढारी ऑनलाईन डेस्क : युगांडा येथील एका शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३८ विद्यार्थ्यांसह ४१ जण ठार झाले आहेत. तर सहा विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेस या संघटनेच्या हल्लेखोरांना हा हल्ला घडवून आणला. (Uganda School Attack)
शुक्रवारी युगांडाच्या सीमेवर असलेल्या म्पोनडवे या गावातील ल्हुबिरिया सेकंड्री स्कूल या शाळेवर हा हल्ला करण्यात आला.
अलाईड डेमोक्रॅटिक फोर्सेस ही संघटना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, असे हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
ही शाळा खासगी असून युगांडातील कासेसे जिल्ह्यात आहे. कांगोच्या सीमेपासून ही शाळा २ किलोमीटर अंतरावर आहे. येथील महापौर सेल्वेस्ट माफोजे यांनी या हल्ल्यात ३८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात १ सुरक्षारक्षक आणि २ गावकरीही मारले गेले आहेत. (Uganda School Attack)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी डॉर्मेट्री आणि धान्याच्या गोडावूनला आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ मृतदेह शाळेतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. युगांडाच्या लष्कराने दहशतवाद्यांचा ठिकाणा शोधाला आहे. हे दहशतवादी काँगोच्या एका नॅशनल पार्कमध्ये लपले आहेत. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या विद्यार्थ्यांना सोडून द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :