Adipurush : प्रभासच्या आदिपुरुषला संमिश्र प्रतिसाद, पहिल्या दिवशी कोटींची कमाई | पुढारी

Adipurush : प्रभासच्या आदिपुरुषला संमिश्र प्रतिसाद, पहिल्या दिवशी कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदू पौराणिक महाकाव्य रामायण से प्रेरित, आदिपुरुषमध्ये प्रभासला राघव आणि कृती सेनॉन माता सीतेच्या रूपात भूमिकेत आहे. सैफ रावणाच्या भूमिकेत आहे. (Adipurush) आता पहिल्य दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांचा बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष रिलीज झाला आहे. प्रभास-कृती सेनॉनच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावर काही सीन्सवरून प्रभासवर टीका केली जात आहे. (Adipurush)

पहिल्या दिवशी कोटींचा गल्ला

बॉक्स ऑफिसवर वेगवेगळ्या रिपोर्टनुसार कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ८० ते ९० कोटींदरम्यान, चित्रपटाची कमाई झाल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपट आदिपुरुषने एकट्या हिंदीमध्ये ४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तमाम ट्रेड ॲनालिस्ट्सचे म्हणणे आहे की, प्रभासचा हा चित्रपट या वीकेंडला धमाकेदार कमाई करणारा आहे.

विशेष म्हणजे देवदत्त नागे ‘भगवान हनुमान’ च्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सनी सिंह ‘लक्ष्मण’च्या भूमिकेत आहे. रामायणवर आधारित हा चित्रपट ५०० कोटींच्या बिग बजेटमध्ये तयार झाला आहे.

अधिक वाचा-

Back to top button