Tamannaah Bhatia : तमन्नाच्या "जी करदा"ची चर्चा, आऊट ऑफ बॉक्स परफॉर्मन्सने जिंकली मने | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्नाच्या "जी करदा"ची चर्चा, आऊट ऑफ बॉक्स परफॉर्मन्सने जिंकली मने

टॅलेंटचे पॉवर हाऊस अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. (Tamannaah Bhatia) तिच्या “जी करदा ” या अमेझॉन प्राईम व्हिडिओ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका बजावणारी तमन्ना तिच्या या नवीन शोमध्ये आगळी वेगळी भूमिका साकारताना बघायला मिळते आहे. तिच्या मनमोहक अभिनयाने प्रेक्षक खुश झाले असून तिच्या अनोख्या पात्राची इंटरनेटवर चर्चा होते आहे. (Tamannaah Bhatia)

तिच्या अभिनय कौशल्याने आणि कमांडिंग स्क्रीन प्रेझेन्सने तमन्नाने “जी करदा”मध्ये स्वतःला पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आणलं आहे. याआधी “बबली बाउन्सर” आणि “प्लॅन ए प्लॅन बी” सारख्या लोकप्रिय ओटीटी रिलीजमध्ये तिने दमदार परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.

“जी करदा” नुकतेच रिलीज झाले असून लवकरच तिला सगळे नेटफ्लिक्सच्या “लस्ट स्टोरीजच्या ” बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये पाहणार आहोत. तमन्नाकडे याशिवाय अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्ट्स आहेत. मल्याळम चित्रपट “बांद्रा”, तेलुगुमध्ये “भोला शंकर” आणि तमिळमध्ये “जेलर” अशा अनेक बहुभाषिक चित्रपटात तिचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार.

Back to top button