सुहाना खान लाजली बिचारी! | पुढारी

सुहाना खान लाजली बिचारी!

बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत समावेश असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. गेले अनेक दिवस ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याच्या चर्चा आहे.अशातच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुहाना आणि अगस्त्य बालपणीचे मित्र आहेत. लवकरच ते दोघे झोया अख्तरच्या ‘द अर्चिस’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्यांचा एक फोटो चर्चेत आला आहे. या फोटोत अगस्त्य सुहानाकडे पाठ करून कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. तर सुहाना अगस्त्यच्या मागे उभी राहून त्याच्याकडे पाहून लाजताना दिसत आहे. आता त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ते दोघे एकत्र खूप छान दिसत आहेत, अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. कपूर कुटुंबाने आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत अगस्त्यने त्याच्या घरच्यांना सुहानाची ओळख त्याची पार्टनर म्हणून करून दिली होती, पण अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्यात आलेले नाही.

Back to top button