Rakul Preet Singh : अडीच मिनिटांच्या सीनसाठी 14 तास पाण्यात

rakul
rakul

आय लव्ह यू या आगामी चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा अडीच मिनिटांचा पाण्याखालील सीन आहे. याबाबत ती एका मुलाखतीत म्हणाली, अडीच मिनिटांचा हा सीन शूट करण्यासाठी तिला सुमारे 14 तास पाण्यात राहावे लागले. मला या चित्रपटासाठी अंडरवॉटर सीक्वेन्स शूट करायचा होता. यासाठी मला अझान नावाच्या स्कूबा इन्स्ट्रक्टरने प्रशिक्षण दिले. त्याने मला दोन महिने पाण्याखाली अडीच मिनिटे राहायला शिकवले. या सीक्वेन्सचे शूटिंग करत असताना मी दुपारी 2 ते पहाटे4 वाजेपर्यंत पाण्यात होते. माझ्यासाठी हे सर्वात मोठे आव्हान होते.

मी दिवसभर थंड पाण्यात उभी असायचे. मला थंडी वाजू नये म्हणून क्रू-मेंबर्स सतत माझ्यावर गरम पाणी ओतत असतानाही पाणी खूप थंड लागायचे. निखिल महाजन दिग्दर्शित 'आय लव्ह यू' हा चित्रपट 16 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रकुलशिवाय पावेल गुलाटी आणि अक्षय ओबेरॉय दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news