Sunny Leone : सिडनी फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सनीचा अनोखा लूक | पुढारी

Sunny Leone : सिडनी फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सनीचा अनोखा लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅशन गेममुळे चर्चेत आहे. आधी कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि आता सिडनी फिल्म फेस्टिवल तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा बघून सगळेच अवाक आहेत. (Sunny Leone) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडी चित्रपटाने सगळ्यांची मने जिंकल्यानंतर आता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहोचला आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशन आणि फिल्म दोन्हींच्या चर्चा होताना दिसत आहे. (Sunny Leone)

सिडनी फिल्म फेस्टिव्हल
सिडनी फिल्म फेस्टिव्हल

सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडीच्या स्क्रिनिंगसाठी सनीने साईशा शिंदेचा मोहक स्ट्रॅपलेस फिकट निळा फ्लोय ड्रेस घातला आणि सनीच सौंदर्य अजून खुलून आलं. हा स्टायलिस्ट लूक हितेंद्र कपोपारा याने स्टाईल केला होता.

सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनीने तिच्या फॅशनने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. मॉडिश लुक्स आणि फॅशन आयकॉन असलेली सनी या अनोख्या लूक मध्ये मनमोहक दिसत होती. केनेडी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. केनेडीच्या सोबतीने सनी अनेक नवीन भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतय.

Back to top button